श्री. संतोष करंजे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषी विज्ञान केंद्र, बारामती
हरभरा हे एक रब्बी हंगामामधील महत्वाचे कडधान्य पिक आहे. पिक फेरपालटामध्येही हरभरा हे एक उपयुक्त द्विदल पिक आहे. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये १७.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड होऊन १५.०७ लाख टन हरभरा उत्पादन झाले. राज्याची सरासरी उत्पादकता ८.५० क्विंटल प्रति हेक्टर आहे. जमिनीची मशागत, पेरणी, रासायनिक खतांचा समतोल वापर, सुधारित वाणांची निवड, फायदेशीर पीक पद्धतीचा अवलंब, आंतरमशागत, गरजेनुसार पीक संरक्षण, तणांचा बंदोबस्त, उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम वापर या सुधारित लागवड तंत्रज्ञानाद्वारे हरभरा उत्पादकेत वाढ करणे शक्य आहे.
Read More